26/11 Terrorist Attack : आकुर्डी येथे 26/11 हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण

एमपीसी न्यूज – देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी (दि.26) आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमी यांच्या वतीने अमर ज्योत पेटवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Pimpri News: ‘सामाजिक भान ठेऊन अभिव्यक्त झाल्यास खरे स्वातंत्र्य निश्चितपणे उपभोगता येईल’

यावेळी पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंह, भारतीय माजी सैनिक संघ महाराष्ट्र अध्यक्ष गोपाल वानखडे, सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमीचे संस्थापक रामदास मदने, भारतीय माजी सैनिक संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत महाडिक, सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमीचे सहसंचालक अशोक जाधव, अकॅडमी चे मुख्य प्रशिक्षक मोहनिष बारिया, पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कार्तिक गोवर्धन, पुणे शहर आयटी सेल अध्यक्ष योगेश खैरे, युवक उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष सागर पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रणजित वडणे, सचिव राकेश सायकर, रामय्या हिरेमठ, संग्राम लाड, शिवनाथ मांडे, प्रसाद कुदळे, राज सय्यद, अमर तळेले, वैभव हेन्द्रे, मंगेश साठे, मोरेश्वर कांबळे, अनुज शहा, आदेश नाणेकर, श्रीशैल शिरगावे, सुरेंद्र मालविय आदींनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंह यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.