Alandi Crime News : आळंदीत किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी 

एमपीसी न्यूज – पाण्याची मोटार सुरु करण्यावरून दोन गटात वाद झाला. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना सोमवारी (दि. 1) सकाळी आळंदी येथे घडली.

ज्ञानोबा लक्ष्मणराव म्हस्के (वय 70, रा. तापकीरनगर, आळंदी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणपती म्हस्के (वय 62), आदिनाथ म्हस्के (वय 52), मंगेश म्हस्के (वय 26), अंतिका म्हस्के (वय 50), स्वाती गाडे (सर्व रा. तापकीरनगर, आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पिण्याच्या पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असता आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातू यांना हाताने, विटाने, काठी, लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात मंगेश आदिनाथ म्हस्के (वय 26, रा. तापकीरनगर, आळंदी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ज्ञानोबा लक्ष्मण म्हस्के (वय 75), गोवर्धन ज्ञानोबा म्हस्के (वय 38), ऋषिकेश शहादेव टेकाळे (वय 30), कमल ज्ञानोबा म्हस्के (वय 70), कौसल्या टेकाळे (सर्व रा. तापकीरनगर, आळंदी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे वडील पाण्याची मोटार सुरु करण्यासाठी गेले असता आरोपींनी ‘तुम्ही अजिबात पाणी घ्यायचे नाही’ असे म्हणून फिर्यादी यांच्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून जखमी केले. तसेच फिर्यादी, त्यांची आई आणि आजोबा यांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास दिघी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.