Chikhali Crime News : शेलारवस्ती येथे चारचाकीच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – चारचाकीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. चिखली – देहुरोडवरती शेलारवस्ती, चिखली येथे शुक्रवारी (दि.10) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी चारचाकी चालकाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळु बाबुराव उगवे (वय 63) आणि मिरा बाळु उगवे (वय 63) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मनोज बाळु उगवे (वय 32, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी चालक नेताजी भिसे ( रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बाळु व मिरा उगवे दुचाकीवरून (एमएच 14 ईएस 0442) सांगुर्डे, देहुगाव याठिकाणी निघाले होते. यावेळी चिखली – देहूरोड शेलार वस्ती, चिखली येथे त्यांच्या दुचाकीला (एमएच 12 बीपी 6269) या चारचाकीने मागून धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, चिखली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.