Pune Accident News : पुणे-पंढरपूर मार्गावर बस दुचाकीचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – पुरंदर तालुक्यातील पिंपरी खुर्द गावाजवळ दुचाकी आणि एसटी बसच्या भीषण अपघात (Pune Accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात विजय काळे व नाना भुजबळ यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पिंपरी-चिंचवड ते गाणगापुर बस रात्रीच्या सुमारास गाणगापूर च्या दिशेने निघाली होती. तर सुकलवाडी व माळवाडी येथे राहणारे दोन तरुण दुचाकीने सुकलवाडी गावाकडे निघाले होते. दरम्यान पिंपरी येथील जय हॉटेल समोर दुचाकी आणि बसमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली.

HSC Result 2022 : बारावी परीक्षेत प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल

या अपघातात (Pune Accident) दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.