Rahatani : रहाटणी येथे स्पा सेंटरवर छापा टाकत दोन पिडीतांची सुटका

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील एका स्पा सेंटरवर छापा (Rahatani) टाकत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन पीडित मुलींची सुटका केली असून दोघांना अटक केली आहे. हि कारवाई पोलिसांनी गुरुवारी (दि.15) रहाटणी शिवार चौकात केली आहे.

या प्रकऱणी पोलिसांना एक महिला व रोहन विलास समुद्रे (वय 34 रा.पिंपरी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे शिवार चौकात APPLE SPA नावाने स्पा सेंटर चालवायचे. जिथे ते पीडितेकडून स्वतःच्या उपजिवेकासाठी वेश्या व्यवसाय करवून घेत होते.

Dighi : पाच तलवारी व दोन कुकरीसह तिघांना अटक

य़ावरून पोलिसांनी आरोपींना अटक करत दोन मुलींची सुटका (Rahatani) केली आहे. तर, आरोपींवर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

हि कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंग सिसोदे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगिता जाधव, रेश्मा झावरे, सोनाली माने यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.