Dighi : पाच तलवारी व दोन कुकरीसह तिघांना अटक

एमपीसी न्यूज : पाच तलवारी व दोन कुकरीसह (Dighi) दिघी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर, एकावर गुन्हा दाखल केला आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.15) दिघी येथील तालेरा नगर येथे करण्यात आली. 

भारत नामदेव कोल्हे (वय 47 रा.येवला), विक्रम श्रीकृष्ण डेमसे (वय 25 रा.नाशिक) , निरंजन अनिल ओदवंत (वय 24 रा.कोपरगाव, अहमदनगर) अशी अटक आरोपींची नावे असून एका अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकऱणी दिघी पोलिस ठाण्याचे पोलीस अमंलदार अविनाश गोविंद देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

PCMC : भूमी आणि जिंदगी विभागाचा कारभार विजयकुमार सरनाईक यांच्याकडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी 14 हजार रुपयांच्या 5 तलावारी व 4 हजार रुपयांच्या दोन कुकरी अशी 18 हजार रुपयांच्या शस्त्रे जप्त करण्यात आली. हि शस्त्रे हरियाणा (Dighi) येथील अज्ञात आरोपीकडून मागविण्यात आली होती. यावरून आरोपी विरोधात दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून याचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.