Maharashtra : दिल्लीसमोर शेपट्या आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हे, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा

एमपीसी न्यूज : दिल्लीसमोर शेपट्या आत घालून बसणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्यावर निशाणा साधला.(Maharashtra) शिवसेना नेते रामदास कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये गोळीबार मैदानात आज उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल केला. 

उद्धव ठाकरे म्हणाले, मी घरात राहुन जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्हीं घरोघरी जाऊन, गुवाहाटीला फिरुन सांभाळु शकत नाही आहात. (Maharashtra) दिल्लीत मुजरे मारायला जाण्यात अर्ध आयुष्य जातय आणि ज्याना मंत्रीपद दिली नाहीत त्यांना सांभाळताना उरलेल जातंय अशी टीका उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली आहे.

ठाकरे म्हणाले, सगळे उद्योगधंदे गुजरातला जात होते, कारण गुजरातमध्ये निवडणूका होत्या. आता परवा आयफोनचा प्रकल्प कर्नाटकला गेलाय, कारण आता तिकडे निवडणूका होणार आहेत. हे तुटलेल्या फुटलेल्या एसटीवर हासरे चेहरे टाकुन जाहिराती करत आहेत. माझ्या वेळेस ‘माझ कुटुंब, माझी जबाबदारी’ ही एकच घोषणा होती, कारण हे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Chinchwad News : अधिक जोमाने पुढील निवडणुकांच्या तयारीला लागा; शरद पवार यांच्या सूचना

उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांना शक्य ते दिलं, पण ते आता खोक्यात बंद झाले. आज माझे हात रिकामे आहेत, मी तुम्हाला काहीही देऊ शकत नाही. आज मी तुमच्याकडे मागायला आलोय. तुमची सोबत मला हवी आहे. जे भुरटे चोर, गद्दार आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की, तुम्ही शिवसेना हे नाव चोरू शकाल, पण शिवसेना चोरू शकणार नाही. जिथे रावण आपटला तिथे मिंधे गटाचं काय?

यावेळी ठाकरेंनी निवडणूक आयोगावरही सडकून टिका केली. हा चुना लगाव आयोग आहे, सत्तेचे गुलाम आहेत. ते म्हणाले की, वरुन काय आदेश येईल त्याप्रमाणे वागणारे आहेत ते.(Maharashtra) या निवडणूक आयोगाचे वडील वरती बसले असतील पण शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केलीय हे लक्षात ठेवा. निवडणूक आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले की, कोण होता हा भाजप? कोण होतं त्यांच्या मागे? बाळासाहेब त्यांच्या मागे राहिल्याने ते वाढले. ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते, त्यांना असंच चिरडायचं असतं. ही ढेकणं चिरडायला एक बोट पुरेसं आहे. ज्यांना आपलं कुटुंब मानलं त्यांनीच आपल्या आईवर हल्ला केला. ज्यांचं राजकीय आयुष्य गेल्या 10-15 वर्षात फुललं, ते आता आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवतात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.