Moshi theft : भागीदाराने अनधिकृतपणे व्यावसायिक गाळ्यांचा ताबा घेत केली चोरी

एमपीसी न्यूज – भागीदाराने आठ व्यावसायिक गाळ्यांना कुलूप लावून त्यावर ताबा मारला. तसेच 35 हजारांचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Moshi theft) ही घटना 11 जुलै ते 19 नोव्हेंबर या कालावधीत बोऱ्हाडे वाडी मोशी येथे घडली.

साहेबराव विठ्ठलराव तांबे (वय 76 , रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब बबन बोराटे (वय 52, रा. मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Talegaon Dabhade : रोटरीतर्फे मोफत मधुमेह तपासणी शिबीर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांनी दोघांच्या मालकीच्या जागेचा विकसन करारनामा करून त्याचे कुलमुखत्यारपत्र बनवले. महापालिकेच्या परवानगीने विकसित केलेल्या बांधकाम साईटवर फिर्यादी यांच्या मालकी हक्काचे आठ व्यावसायिक गाळ्यांमध्ये भागीदार आरोपी बोराटे यांनी कोयत्याचा धाक दाखवून ताबा मारला. सुरक्षा रक्षक आणि सुपरवायझरला धमकावून गाळ्यांना कुलूप लावले.(Moshi theft) त्या बांधकाम साईटवरून 35 हजारांचे साहित्य आरोपीने चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.