Maharashtra News : ‘ऑपरेशन लोटस’ ? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोकण दौऱ्यावर

एमपीसी न्यूज : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणात भाजपने चांगली कामगिरी करत शिवसेनेला दणका दिला. खासदार नारायण राणे यांच्यामुळे हे शक्य झाल्याने, भारतीय जनता पक्षाचा नारायण राणेंवरील विश्वास दृढ झाल्याच्या चर्चा आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज कोकण दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, हा दौरा काल म्हणजेच काल 6 फेब्रुवारीला होणार होता, परंतु आंदोलक शतकऱ्यांच्या चक्का जाममुळे हा दौरा एक दिवस पुढे ढकलण्यात आला.

दरम्यान ‘आम्ही कोणतीही शिडी न वापरता फासे पलटू शकतो’ असे विधान एका कार्यक्रमात फडणवीस यांनी केल्याने विधानसभाध्यक्ष निवडणुकीच्या निमित्ताने ‘ऑपरेशन कमळ’ होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी रविवारी सिंधुदुर्गात आहेत. शहा यांच्या पायगुणाने महाविकास आघाडी सरकार पडावे, असे विधान राणे यांनी शनिवारी केले.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याबद्दल सांगतना नारायण राणे म्हणाले, ‘ दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी अमित शहा मेडिकल कॉलेज येथे येणार आहेत. 2 वाजून 20 मिनिटांनी मेडिकल कॉलेजचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अमित शहा उद्घटनस्थळी 1 तास थांबतील. कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून, यावेळी विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप नेत्यांकडून केंद्रीय मंत्री अमित शहांचे स्वागत केले जाईल. हा कार्यक्रम संपल्यावर ते हेलिकॉप्टरने गोव्याला रवाना होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.