Pune : तलाठी महिलेला पाच हजारांची लाच स्वीकारताना एबीसीच्या पथकाने रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज – सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठी महिलेला आज गुरुवारी (दि 25) पुणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना हक्कसोड पत्राद्वारे मिळालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी सजा निगडे,ता मावळ येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. याची नोंद घेण्यासाठी येथील तलाठी सुजाता रच्चेवाल यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही बाब तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग येथे कळविली व त्याप्रमाणे तक्रार नोंदविली.

या तक्रारीची आज पडताळणी केली असता तलाठी सुजाता यांनी लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार आज लाचलूचपत प्रतिबंधक विभाग यांनी सापळा रचून वडगाव मावळ येथे तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताच रंगेहाथ पकडले. वडगाव मावळ पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे लाचलूचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.