Uttar Pradesh : स्वसंरक्षणासाठी 60 वर्षीय महिलेने दिली टाईम बॉम्बची ऑर्डर

एमपीसी न्यूज – आपल्याकडे ‘ऐकावे ते नवल’ अशी (Uttar Pradesh)एक म्हण आहे. त्या म्हणीला साजेशी घटना उत्तर प्रदेश मधल्या मुजफ्फरनगर येथून समोर आली आहे. इम्राना बेगम या 60 वर्षीय महिलेने चक्क स्वसंरक्षणासाठी टाईम बॉम्ब बनवण्याची ऑर्डर दिली आहे. बॉम्ब तयार करून घेऊन जात असताना तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर हा अनोखा प्रकार उघडकीस आला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी मुजफ्फरनगर मधून पोलिसांनी (Uttar Pradesh)एका व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडे टाईम बॉम्ब सापडल्याने या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्या तरुणाकडे तपास केला असता त्या तरुणाला एका महिलेने ऑर्डर दिली असल्याचे समोर आले. या प्रकरणाचे धागेदोरे दूरपर्यंत जाणार असल्याने पोलिसांनी याची कसून चौकशी सुरु केली.

पोलिसांनी ऑर्डर देणाऱ्या महिलेकडे चौकशी केली असता तिने हे मान्य देखील केले. पण बॉम्बची ऑर्डर देण्याचे कारण ऐकून पोलिसांनी डोक्याला हात लावला. ऑर्डर दिलेले बॉम्ब स्वतःच्या संरक्षणासाठी असल्याचे महिलेने सांगितले.

Alandi: पिस्तुलाचा धाक दाखवत स्वयंघोषित भाईची दहशत

सन 2013 मध्ये मुजफ्फरनगर येथे दंगली झाल्या. त्यात महिलेचे घर पेटवण्यात आले होते. इम्राना बेगम यांचे घर पेटवण्यात आले होते. भविष्यात जर पुन्हा असा प्रकार घडला तर संरक्षण म्हणून आपल्याला हे बॉम्ब हवे होते, असे या महिलेने पोलिसांना सांगितले.

महिलेची आणि तरुणाची भेट झाल्यावर तो बॉम्ब तयार करतो, हे तिला माहिती झाले. त्यानुसार तिने त्याला आपल्यासाठी बॉम्ब बनवण्याची ऑर्डर दिली. बॉम्ब बनवण्यासाठी महिलेने 10 हजार रुपये अॅडव्हांस म्हणून दिले होते. तर उर्वरित 40 हजार रुपये बॉम्ब मिळाल्यानंतर देण्याचा व्यवहार ठरला होता.

दंगलीत आपले घर जाळले होते. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून इम्राना हिने ही ऑर्डर दिल्याचे समोर आले असले तरी पोलीस सर्व शक्यता तपासून पाहत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.