-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vadgaon Maval News : ग्रामीण भागात कोविड प्रतिबंधक लसीकरण करा – सुनील भोंगाडे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक चे लसीकरण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचा मागणीचे निवेदन सोमवारी (दि.19) मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांना अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मावळ तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी जास्त होत असुन  ग्रामीण भागातील नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस मिळत असुन अनेकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात चकरा माराव्या लागत आहेत. त्यातच  भात लावणीची कामे सुरू असल्याने शेतकरी व नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता ग्रामीण भागात कोविड लसीकरण तातडीने करण्याची मागणी लेखी निवेदनात केली आहे.

याप्रसंगी सरपंच परिषदेचे मावळ तालुकाध्यक्ष सुनील नाना भोंगाडे, भोयरेचे सरपंच बळीराम भोईरकर, सातेचे सरपंच प्रकाश आगाळमे , वळकचे उपसरपंच गोरख बांगर, प्रकाश पिंगळे,  पवनानगर चे उपसरपंच संजू मोहोळ, शिळीम उपसरपंच नंदू धनवे, चंद्रशेखर परचंड, कांब्रे स्वामी गायकवाड, नागाथलीचे कैलास खांडभोर बहुतेक  सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.