-MPC-TOP-MOST-BANNER-I

Corona News : दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ; केंद्र सरकार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – ‘कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नाही. पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी 3 हजार 095 मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी नऊ हजार मेट्रिक टन पर्यंत पोहोचली. त्यामुळे केंद्राने राज्यांमध्ये समान वितरणाची सोय करावी लागली,’ असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी राज्यसभेत सांगितले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने राज्यसभेत निवेदन देताना असे म्हटले की आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार करोना रुग्ण संख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते.

दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे रस्त्यावर आणि रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोविड-19 रूग्णांचा मृत्यू झाला का या प्रश्नाच्या उत्तरावर आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांनी उत्तर दिले. ‘आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे बाधितांची आकडेवारी आणि मृत्यूची संख्या केंद्राकडे नोंदवतात.’

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

दरम्यान आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी लेखी उत्तरात म्हटलं आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. राज्यातील कोरोनाबाधितांची नोंद आणि मृत्यूची संख्या नोंदवण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार सर्व राज्य सरकार नोंदणी करुन माहिती पुरवत आहेत. त्यानुसार कोणत्याही राज्यात ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली नाही.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.