Vadgaon : ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी अरुण वाघमारे

एमपीसी न्यूज – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या (Vadgaon)आदेशानुसार नुकतीच जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद गठीत करण्यात आली आहे. पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी वडगाव मावळ येथील अरुण वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

यामध्ये पदसिद्ध 21, ग्राहक संघटनांचे 10, वैद्यकीय, व्यापार व शेतकरी क्षेत्रातील प्रत्येकी दोन अशा एकूण 36 पदाधिकऱ्यांचा समावेश आहे. या परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर जिल्हा पुरवठा अधिकारी हे समितीचे सचिव असणार आहेत.

Talegaon : नवीन माथाडी संघटना निर्माण करण्यास विरोध केल्याने जातीवाचक शिवीगाळ

या परिषदमध्ये ग्राहक संघटनाचे प्रतिनिधी म्हणून अरुण वाघमारे (Vadgaon)यांची नेमणूक करण्यात आली आहे, ते ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव म्हणून कार्यरत असून भारतीय मानक ब्यूरो नियंत्रण परिषद व ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. ग्राहक चळवळीमध्ये ते गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय असून वडगाव शहरातील स्व.केशवराव ढोरे प्रतिष्ठान,मावळ फेस्टिवल,मावळ विचार मंच आदी संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.