Chinchwad : सुरक्षा रक्षकांना मारहाण करत बँकेने सील केलेल्या फॅक्टरीमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 18 ते 19 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बँकेच्या कर्जाची परतफेड न (Chinchwad) केल्याप्रकरणी बँकेने सील केलेल्या फॅक्टरीत बेकायदेशीर रित्या घुसू पाहणाऱ्या 18 ते 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.20) चिंचवड येथील कल्पक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीज येथे घडली.

याप्रकरणी पिंपरी येथील अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक राजू मल्लप्पा सौंदलगेकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी कल्पक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक चांगदेव रामचंद्र कोलते (वय 55 रा चिंचवड) व प्रसाद गणपत कोलते (वय 35 रा निगडी) या दोघांसह विवेक गणपत कोलते, तुषार चांगदेव कोलते व त्यांच्यासोबत असलेले 10 ते 15 अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Vadgaon : ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यपदी अरुण वाघमारे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चांगदेव कोलते व प्रसाद कोलते यांनी बँकेकडे त्यांची मिळकत तारण ठेवून बँकेकडून 20 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांनी वेळेत कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने कायदेशीर रित्या कारवाई करत मंगळवारी (दि.19) दुपारी चिंचवड येथील आरोपी यांची कंपनी कल्पक इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी याला सील केले होते.

यावेळी बँकेने तिथे सिक्युरिटी गार्ड देखील नेमले होते. मात्र आरोपींनी फॅक्टरीच्या इथे येऊन  (Chinchwad) सिक्युरिटी गार्ड सोबत धक्काबुक्की व दमदाटी करत फॅक्टरीला लावलेले सील व कुलूप तोडून फॅक्टरीमध्ये बेकायदेशीर रित्या प्रवेश केला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.