Vadgaon Maval : आंबी येथील भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी अर्जुन वारींगे; उपाध्यक्षपदी गणेश घोजगे

एमपीसी न्यूज – आंबी (Vadgaon Maval) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्था मर्यादित सोसायटीच्या अध्यक्षपदाचा रामनाथ घोजगे आणि उपाध्यक्ष पदाचा नारायण मोरे यांनी राजीनामा दिला. यासाठी मंगळवारी (दि. 4) सहायक निबंधक कार्यालयात विशेष सभा पार पडली. यावेळी टाटा मोटर्सचे गुणवंत कामगार अर्जुन झिपाजी वारींगे यांची अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी हभप गणेश खंडू घोजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या आधीचे अध्यक्ष रामनाथ घोजगे व उपाध्यक्ष नारायण मोरे यांनी राजीनामा दिल्याने ही पदे रिक्त झाली होती. रिक्त झालेल्या ह्या दोन्ही पदांच्या निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंदार कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार दि 4 जुलै2023 रोजी सकाळी 11 वा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ या कार्यालयात विशेष सभा झाली.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्जुन वारींगे व गणेश घोजगे यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांनी त्यांची अध्यक्षपदी व उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली.

Pune Crime : कोयत्यासह महाविद्यालयात धुडगूस घालणाऱ्यांची पुणे पोलिसांनी काढली धिंड

याप्रसंगी संस्थेचे संचालक सोमनाथ गव्हाणे, संभाजी घोजगे, प्रकाश कलावडे, नामदेव दरेकर, रोहिदास जगदाळे, राहुल बनसोडे, बाळासाहेब तुमकर,अश्विनी वारींगे, जयश्री घोजगे, सचिव गुलाब ढोरे तसेच माजी उपसभापती शांताराम कदम, माजी चेअरमन पिराजी वारींगे, दत्तात्रय चिंधु घोजगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रम कलावडे, आंबळे विकास सोसायटीचे सचिव दत्तात्रय वारींगे, ॲड सुधा डिमळे, रामनाथ धुमाळ, राजेंद्र तुमकर, मारूती वारींगे, कैलास शिंदे सह संस्थेचे सभासद, मान्यवर मोठया संख्येने उपस्थित (Vadgaon Maval ) होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या निवडीमुळे पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण तालुकाभर अभिनंदन! व कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.