Vadgaon Maval: मोदी सरकार 2.0 वर्षपूर्ती; भाजपच्या जनसंपर्क अभियानाचा वडगावला शुभारंभ

Vadgaon Maval: BJP's Public Relations Campaign Launched at vadgaon on the Occasion of Modi Government 2.0's Anniversary या अभियानात भाजप कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधून लिहिलेल्या पत्राचे घरोघरी जाऊन वाटप करणार आहेत.

एमपीसी न्यूज- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने संपूर्ण देशभर वर्षपूर्ती जनसंपर्क अभियानाचे आयोजन केले आहे.

या अभियानात भाजप कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधून लिहिलेल्या पत्राचे घरोघरी जाऊन वाटप करणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

या पत्रामध्ये मागील वर्षभरात केंद्र सरकारने घेतलेल्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांचा व केलेल्या कार्याचा अहवाल मांडलेला आहे. मावळ तालुका भाजपच्या वतीने या अभियानाची सुरुवात वडगाव येथून करण्यात आली.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, सुनील चव्हाण, सुमित्रा जाधव, जितेंद्र बोत्रे, संदीप काकडे, सुनील वरघडे, सुभाष धामणकर यांच्यासह वडगाव शहर भाजपचे अध्यक्ष किरण भिलारे, प्रसाद पिंगळे, धनश्री भोंडवे, रमेश ढोरे, भूषण मुथा, नगरसेवक किरण म्हाळसकर, शामराव ढोरे, अॅड विजय जाधव, शरद मोरे, रविंद्र म्हाळसकर, नामदेव वारिंगे, विकी म्हाळसकर, वैशाली म्हाळसकर, वैशाली ढोरे, आश्विनी बवरे आदी उपस्थित होते.

किरण राक्षे यांनी सूत्रसंचालन केले. अनंता कुडे यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1