Vadgaon maval : शेतजमिनीवर जबरदस्तीने ताबा मारल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : शेत जमिनीवर जबरदस्तीने ताबा मारला. शेतात लावलेल्या सिमेंट पोलची तोडफोड करून शिवीगाळ दमदाटी करून शेतकऱ्याला (Vadgaon maval) जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरुवारी (दि.8) मावळ तालुक्यातील पिंपळखुटे येथे घडली. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळखुटे येथील गट नंबर 145 शेतजमीनमध्ये चार जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करून शेतात लावलेले सिमेंटचे संरक्षक तार कंपाउंड तोडून शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी (दि.8) पिंपळखुटे ता. मावळ जि. पुणे येथे घडली.याप्रकरणी सतीश सदाशिव गाडे यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Today’s Horoscope 12 December 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सुधीर कबीर हिंगे, महेंद्र कबीर हिंगे, गोकुळ गणपत हिंगे व  नंदू साहेबराव हिंगे (सर्व रा. पिंपळखुटे ता. मावळ जि. पुणे) गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सतीश गाडे व बाळु गराडे यांच्या मालकी हक्काची व ताबे वहिवाटीची पिंपळखुटे येथील गट नंबर 145 शेतजमीन असून आरोपी सुधीर हिंगे, महेंद्र हिंगे, गोकुळ हिंगे व  नंदू हिंगे आदींनी अनधिकृतपणे जनावरांचा गोठा बांधून अतिक्रमण केलेले आहे. सदर अतिक्रमण काढण्याबाबत महसूल विभागाने आदेश दिलेला आहे.

फिर्यादी व त्यांचा साथीदार यांच्याह  जमिनीची पाहणी करण्यासाठी गेले असता त्यावेळी आरोपींनी गोठा बांधून अतिक्रमण केले म्हणून तक्रार देता काय कोणाचाही आदेश आला तरी मी गोठा काढणार नाही असे म्हणत शेतात लावलेले सिमेंटचे संरक्षक 20 ते 25 सिमेंट पोलची तोडफोड (Vadgaon maval) करून इतर साहित्याचे तोडून नुकसान केले आहे. तसेच फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अंकुश मिसाळ करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.