Vadgaon Maval : आंबळे हद्दीतील स्टोन क्रशर बंद करण्याचा ग्रामसभेत निर्णय

एमपीसी न्यूज – आंबळे गाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांना ( Vadgaon Maval ) स्टोन क्रशरमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा स्टोन क्रशर नागरिकांच्या दृष्टीने घातक बनला असल्याने तो बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला आहे. आंबळे ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेत हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

आंबळे येथील श्री पद्मावती देवी मंदिरात माजी उपसभापती शांताराम कदम,सरपंच आशा संपत कदम, उपसरपंच रेखा विलास भालेराव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत हद्दीतील आंबळे, मंगरूळ, कदमवाडी, घोलपवाडी, शिरे,शेटेवाडी,गोळेवाडी या गावातील सुमारे सव्वाशे नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या ग्रामसभेत नागरिकांनी स्टोन क्रशर मुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत तक्रारी मांडल्या.

यावेळी आंबी ते खराळओढा या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत तहसिलदार,जिल्हाधिकारी,पोलिस प्रशासन यास निवेदन देणे, स्टोन क्रशन प्रदुषणामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवन व त्यामुळे मानवी जिवनावर होणारे दुष्परीणाम याबाबत प्रदुषण नियत्रंण महामंडळास निवेदन देणे व तात्काळ कारवाई करणेस सांगणे. बेकायदेशीर उत्खनना बाबत गौणखनिज विभागस निवेदन देणे व तात्काळ उत्खनन थांबविणे.

धोकादायक वाहतुकी बाबत पोलिसखात्याला निवेदन देणे व बेकायदेशीर वाहतुक थांबविणे, स्टोन क्रशर प्रदुषणामुळेमुळे जनावरांच्या चाऱ्याची झालेली दुरआवस्था थांबवणे. नागरिकांचे आरोग्य व मुलभुत सुविधावर प्रदुषणामुळे होणारे दुष्परीणाम थांबवणे, विद्यार्थी व कामगार वर्ग व व्यावसायिक यांना रस्त्यानी जा ये करताना होणारा अपघात थांबविणे. अवैध उत्खनन, स्टोन क्रशर, वाळू सॉन्ड प्लान्ट, डांबर प्लान्ट, व ब्लास्टिंग कायमस्वरूपी बंद करणे व सबंधित विषयांकरीता लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण, रस्तारोको आंदोलन करणेबाबत यावेळी ठराव मंजूर करण्यात ( Vadgaon Maval ) आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.