Vadgaon Maval : कुक्कुटपालकांनी लक्ष्मीपूजनानिमित्त केले कुक्कुट पक्षांचे पूजन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील (Vadgaon Maval) शेतीपुरक कुक्कुटपालन व्यवसाय करणा-या उद्योजकांनी लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने पोल्ट्रीशेड व पक्षांची सहकुटुंब पुजा करून दिवाळी साजरी केली. मावळ तालुक्यातील अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांनी कुक्कुट पक्षांचे पूजन करत आनंदी आणि उत्साही वातावरणात दिवाळी साजरी केली.

सध्या दिपावलीचा सण सर्वत्र आनंदाने आणी उत्साहाने साजरा केला जात आहे. शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय करणा-यांनीही आपल्या कुटुंबासमवेत पोल्ट्री शेडची आणी पक्षांची पूजा केली.

शेडच्या दारावर झेंडुच्या फुलांचे हार आणी तोरणे लावण्यात आली होती. देवासमोर आकर्षक रांगोळया काढण्यात आल्या (Vadgaon Maval) होत्या. तर काही फार्मरने पोल्ट्री शेडवर आकर्षक अशी विजेची रोषणाई केलेली होती. तर काही शेतकऱ्यांनी आतील पक्षांची विधीवत पूजा केली.तसेच उपस्थितांना पेढे वाटप केले. याशिवाय शेडवर काम करणाऱ्या नोकरांना दिवाळीनिमीत्ताने भेटवस्तू वाटप करण्यात आल्या.

PCMC : महापालिकेत शासनाचे अधिकारी झाले उदंड !

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेचे तालुका अध्यक्ष एकनाथ गाडे, कार्याध्यक्ष सुभाष केदारी,सचिव प्रविण शिंदे व संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी सर्व पोल्ट्री उद्योजकांना शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.