Vadgaon Maval : प्रगतीशील शेतकरी बंडोपंत भोसले यांचे निधन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील प्रगतीशील शेतकरी बंडोपंत कुंडलिकराव भोसले (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या मागे भाऊ, तीन मुले, पुतणे, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. तसेच त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग असायचा. हाडाचे शेतकरी अशी त्यांची ओळख होती.

  • उद्योजक विठ्ठलराव भोसले हे त्यांचे ते बंधू तर, शंकर भोसले, पोपट भोसले, उद्योजक बाळासाहेब भोसले यांचे ते वडील होत. तर सोमनाथ भोसले यांचे ते आजोबा होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.