Mumbai : राज्याच्या मंत्रिमंडळातून ‘यांना’ मिळाला डच्चू!

एमपीसी न्यूज – राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार अखेर रविवारी पार पडला. यावेळी १३ नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.तर गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. 

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे १०, शिवसेनेचे २ तर रिपाईचा एक अशा १३ नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. राजभवनावर पार पडलेल्या विशेष सोहळ्यात राज्यपाल विद्यासागर राव यांनी नव्या मंत्र्यांना पद आणि  गोपनीयतेची शपथ दिली.

  • या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले देखील आहेत. दरम्यान, आता कोणत्या मंत्र्यांच्या वाट्याला कोणते खाते येणार?, ही नवी उत्सुकता सर्वांना लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच नव्या मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत, सूत्रांनी सांगितले आहे.
HB_POST_END_FTR-A2
You might also like