Chinchwad : अबब!! वाल्हेकरवाडी येथील शेतात सूर्यफुलाच्या एकाच झाडावर लागली 28-30 फुले

एमपीसी न्यूज : सूर्यफुलाच्या एका झाडाला एक वेळी एकच फूल (Chinchwad) येत असते. तुम्हाला किती फुले सूर्यफुलाच्या एका झाडाला आली असावीत असे वाटते? तर चिंचवडमधील वाल्हेकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी सचिन तुकाराम वाल्हेकर यांच्या शेतामध्ये सूर्यफुलाच्या एकाच झाडावर 28-30 फुले लागली आहेत. हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.

वाल्हेकरवाडीमध्ये एकाच झाडावर 28 – 30 फुले आली असल्याकारणाने येथील शेतकऱ्यांनी हा निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती. सदर शेतकरी सचिन वाल्हेकर यांनी माहिती दिली, की त्यांची 1 एकर वडिलोपार्जित शेत जमिन आहे. त्यामध्ये त्यांनी वांग्याचे पीक घेतले आहे. त्यामध्ये हे आगळे वेगळे सूर्यफूलाचे झाड आले आहे.

Pune News : गुरुवारी वारजे आणि चांदणी चौक परिसरातील पाणीपुरवठा बंद

सदर झाडाचे बीज उत्पादन माझ्या स्वतःच्या शेतात करून त्याला अशाच प्रकारे अनेक (Chinchwad) फुले आली, तर अनेक शेतकऱ्यांना बियाणे देऊन ज्या पद्धतीने मका टोकन पद्धतीने पीक घेतले जाते, त्या पद्धतीने सूर्यफुलाच घेतले तर शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळू शकते. असे पीक जर शेतकऱ्यांना भेटले, तर एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. तसेच शेतकऱ्यांनी या झाडाची कृषी अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन सदर झाडाचे पीक पुन्हा घेता येऊ शकते का? याचे संशोधन करून आम्हा सर्व शेतकऱ्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावे, अशी मागणी प्रसारमाध्यमांद्वारे कृषीतज्ज्ञ यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.