Vadgaon Maval : संभाजी गुणाट यांचा मावळ लोकसभामतदार संघातून उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज- बळीराजा शेतकरी संघाचे अध्यक्ष संभाजी नामदेव गुणाट यांनी बळीराजा पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी त्यांच्या सोबत गणेश काका जगताप,अंकुश आंबेकर, ह.भ.प.सुखदेव म.ठाकर, बाबाजी महाराज काटकर, दत्ता म.शिंदे. रामचंद्र दादा गुणाट. बाबाजी गायकवाड़, देशमुख मामा फडतरे, सीताराम जगताप, गणेश महाराज जांभळे, गोपीचंद महाराज कचरे, सोमनाथ अडीवळे,जालिंदर सातपुते, निवृत्ती चव्हाण, बाळासाहेब.मोरमारे तसेच अनेक वारकरी उपस्थित होते.

शेतीला सरसकट अनुदान मिळावे, स्वामिनाथन आयोग लागू करणे, शेतकरी मालाला हमीभाव मिळावा, प्रक्रीया उद्योग सुरु करावेत, रोजगार उपलब्ध व्हावा, तालुका जलसंधारण नियोजन करणे, वारकरी मंडळींचे प्रश्न सोडवणे याबाबत न्याय देण्यासाठी उमेदवारी अर्ज भरल्याचे त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.