Vadgaon Maval : मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला अध्यक्षपदी श्रीराम वसंतराव ढोरे

15 ते 23 ऑक्टोबर दरम्यान व्याख्यानमालेचे आयोजन

एमपीसी न्यूज – मावळ (Vadgaon Maval) विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला सन 2023 च्या अध्यक्षपदी श्रीराम ढोरे, कार्याध्यक्षपदी अर्चना कुडे, कार्यक्रम प्रमुखपदी सारिका भिलारे, उपाध्यक्षपदी प्रतीक भालेराव, सचिवपदी माजी नगरसेवक श्रीधर चव्हाण आणि खजिनदारपदी माजी नगरसेवक रवींद्र म्हाळसकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व्याख्यानमालेचे हे 23 वे वर्ष असून यावर्षी व्याख्यानमाला 15 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत दररोज सायंकाळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात संपन्न होणार आहे.

MPC News Online Bappa : ‘एमपीसी न्यूज’ ऑनलाइन बाप्पा उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद (भाग दोन)

मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ मार्गदर्शक सोमनाथ काळे, पंढरीनाथ भिलारे, मारुती चव्हाण, ॲड. बिपिन फलके, मा.नगरसेवक ॲड. विजयराव जाधव,प्रसाद पिंगळे , किरण म्हाळसकर,भूषण मुथा,रवींद्र म्हाळसकर,श्री.पोटोबा देवस्थान संस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे, महाराष्ट्र प्रदेश ग्राहक मंच सचिव अरुण वाघमारे,दीपक भालेराव , प्रा.सचिन अंब्रुळे,अतुल म्हाळसकर, अमोल ठोंबरे,योगेश म्हाळसकर, संतोष भालेराव,श्रेया भंडारी,अश्विनी बवरे,सुषमा जैन,सुवर्णा गाडे ,साक्षी जोगळेकर,स्वाती मोहीरे आदी सदस्य उपस्थित होते.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर,कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य,मावळते अध्यक्ष पत्रकार सुदेश गिरमे,मावळते कार्याध्यक्ष वैशाली ढोरे आणि सर्व संचालक मंडळ आणि सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड करण्यात आली.

व्याख्यानमालेचे हे 23 वे वर्ष असून रविवार 15 ते सोमवार 23 ऑक्टोबर 2023 या कालावधीत दररोज सायंकाळी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात व्याख्यानमाला संपन्न होईल.

मंगळवार दि 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त भारत माता प्रतिमेची भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थापक अध्यक्ष भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रातील ख्यातनाम वक्त्यांच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांना हि वैचारिक मेजवानी उपलब्ध असणार आहे असे मत व्यक्त केले.

कार्याध्यक्ष डॉ.रवींद्र आचार्य यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.

नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीराम ढोरे यांनी आपल्या मनोगतात या निवडीबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेच्या कार्याचा आलेख उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
अनेक सदस्यांनी देखीलआपली मनोगते यावेळी व्यक्त केली.आभार प्रदर्शन हर्षदा दुबे यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.