Talegaon Dabhade : शेतकरी तरुण मंडळाच्या वतीने 100 देशी प्रजातींचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – शेतकरी मित्र मंडळ, कुंभारवाडा तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा कार्यक्रमा अंतर्गत वृक्ष लागवडीचा उपक्रम तळेगाव दाभाडे येथील स्टेशन परिसरातील तळ्यावर राबविण्यात आला. यामध्ये गुरुवारी (दि. 21) देशी प्रजातींच्या 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रत्येकाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा आग्रह केला.

Vadgaon Maval : मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला अध्यक्षपदी श्रीराम वसंतराव ढोरे

यावेळी खजिनदार राहुल भेगडे,विजय भेगडे,दीपक भेगडे, अभिषेक भेगडे, प्रणव दरेकर,प्रज्वल भेगडे, प्रसिद्धीप्रमुख गणेश दरेकर,सारंग दरेकर,प्रचित भेगडे,प्रज्वल भेगडे, संस्कार भेगडे,सार्थक भेगडे,आदेश भेगडे आणि तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथील उद्यान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते

गुरुवार दि 21 सप्टेंबर 2023 रोजी,शेतकरी मित्र मंडळ,कुंभारवाडा तळेगाव दाभाडे व तळेगाव दाभाडे नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने माझी वसुंधरा कार्यक्रमाच्या अंतर्गत वृक्ष लागवडीचा उपक्रम तळेगाव दाभाडे येथील तळेगाव स्टेशन वरील तळ्यावर करण्यात आला यामध्ये 100 देशी झाडांच्या जातीचे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष केदार भेगडे म्हणाले, “सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेऊन पर्यावरण स्नेही कार्यक्रमांचे आयोजन केले पाहिजे.”

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.