Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायत विषय समितीची निवड बिनविरोध

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ नगरपंचायत मधील विविध विषय समित्यांची निवड गुरुवारी (दि. 4) करण्यात आली. स्थायी, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नियोजन व विकास, क्रीडा शिक्षण व सांस्कृतिक, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समित्यांच्या सभापती आणि सदस्यांची आणि महिला व बालकल्याण समिती उपसभापतींची निवडणूक बिनविरोध झाली.

विविध विषय समिती सभापती, उपसभापती निवड तसेच स्थायी समितीच्या स्थापनेसाठी पिठासन अधिकारी तहसीलदार रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्षा अर्चना म्हाळसकर यांसह सर्व नगरसेवक उपस्थित होते. नगरपंचायतीत कार्यरत असलेल्या तिन्ही गटांनी विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध घेण्याचे ठरविले. त्यानुसार प्रत्येक समितीच्या सभापतीपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे पीठासीन अधिकारी रणजित देसाई यांनी ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले. तसेच नगराध्यक्ष मयूर ढोरे हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतील अशी घोषणा केली.

विषय समित्या व सदस्य –

# स्थायी समिती – मयूर ढोरे (सभापती, पदसिद्ध), पूजा वहिले, सायली म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, अर्चना म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर.

# सार्वजनिक आरोग्य समिती – सायली म्हाळसकर (सभापती), राहुल ढोरे, विजय जाधव, दिनेश ढोरे, शारदा ढोरे.

# सार्वजनिक बांधकाम समिती – दिलीप म्हाळसकर (सभापती), चंद्रजित वाघमारे, प्रमिला बाफना, किरण म्हाळसकर, राजेंद्र कुडे.

# नियोजन व विकास समिती – प्रवीण चव्हाण (सभापती), प्रमिला बाफना, विजय जाधव, किरण म्हाळसकर, पूनम जाधव.

# क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समिती – पूजा वहिले (सभापती), राहुल ढोरे, चंद्रजित वाघमारे, किरण म्हाळसकर, दशरथ केंगले.

# पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती – अर्चना म्हाळसकर (सभापती, पदसिद्ध), चंद्रजित वाघमारे, माया चव्हाण, दिनेश ढोरे, शारदा ढोरे.

# महिला व बालकल्याण समिती – सुनीता भिलारे (सभापती), दीपाली मोरे (उपसभापती), प्रमिला बाफना, माया चव्हाण, पूनम जाधव.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.