Vadgaon News : वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रमिला बाफना यांची निवड 

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी आज झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला राजेश बाफना यांनी भाजपच्या उमेदवार सुनिता खंडू भिलारे यांचा दोन मतांनी पराभव करुन विजयी झाल्या. बाफना यांना दहा मते मिळाली तर भिलारे यांना आठ मते मिळाली.

यापुर्वीचे उपनगराध्यक्ष चंद्रजित वाघमारे यांच्या पदाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या पदासाठी आज सोमवार (दि 25) पिठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन उपनगराध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.

या वेळी उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमिला बाफना व भाजपच्या वतीने सुनिता भिलारे यांनी उमेवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदान घेण्यात आले प्रमिला बाफना यांना दहा मते मिळाली तर सुनिता भिलारे यांना आठ मते मिळाल्याने प्रमिला बाफना 2 मतांनी विजयी झाल्याचे नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी जाहीर केले

_MPC_DIR_MPU_II

यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, आघाडीचे नगरसेवक गटनेते राजेंद्र कुडे, माया चव्हाण, राहुल ढोरे, पूजा वहिले, पूनम जाधव, सायली म्हाळसकर, शारदा ढोरे, सुनील ढोरे तर भाजपचे गटनेते दिनेश ढोरे,विरोधी पक्षनेत्या अर्चना म्हाळसकर, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रवीण चव्हाण, दीपाली मोरे, दशरथ खेंगले आदी नगरसेवक उपस्थित होते.

निवड जाहीर झाल्यानंतर संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव, माजी सभापती गणेश आप्पा ढोरे, नगराध्यक्ष मयुर ढोरे, चंद्रजीत वाघमारे, अशोक बाफना आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, मंगेश काका ढोरे, सुनील चव्हाण, किसन वहिले, चंद्रकांत ढोरे, गंगाराम ढोरे, सुरेश कुडे, शांताराम कुडे, विशाल वहिले, पंढरीनाथ ढोरे, अविनाश चव्हाण, सुनील शिंदे, राजेश बाफना, प्रवीण ढोरे, अतुल राऊत, मंगेश खैरे, रोहिदास गराडे, सोमनाथ धोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.