Nigdi News : वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा ॲम्ब्युलन्स पंढरपूरला रवाना 

एमपीसी न्यूज – वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय सेवा देणारी ॲम्ब्युलन्स निगडी येथून पंढरपूरला रवाना झाली आहे. कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने वारक-यांच्या सेवेसाठी ही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

यावेळी प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश मोरे, पुणे जिल्हा वारी व्यवस्थापन समितीचे प्रमुख मुकेश सोमैय्या, विश्वस्त श्रीराम नलावडे, अशोक आहेर, संतोष नलावडे, प्रकाश सातव, डॉ. वसंतराव गोरडे, डॉ. प्रशांत जावळे, शांताराम डफळ, देवेंद्र चौहान, महेंद्र नलावडे उपस्थित होते.

वैष्णव चॅरीटेबल व मेडिकल ट्रस्टच्या वतीने मागील 28 वर्षांपासून मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. वारकरी, गरजू, आश्रम शाळा, आदीवासी भागात, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मुंबई सिद्धी विनायक मंदिर, महालक्ष्मी मंदिर व मुंबादेवी मंदिर, गगनगिरी महाराज मठ, सेवागिरी महाराज मठ यासह आषाढी, माघी, कार्तिकी, चैत्र वारीला आळंदी आणि देहू येथे मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिली जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.