India Corona Update : मोठा दिलासा ! तब्बल 17 महिन्यानंतर निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्येची नोंद 

एमपीसी न्यूज – लसीकरण, वाढलेल्या चाचण्या आणि मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये झालेली जागृती यामुळे भारतातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे. देशात नव्यान वाढ होणा-या रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून दहा हजारांवर स्थिरावली असून बरे कोरोनामुक्तांची संख्या वाढली आहे. यामुळे ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत लक्षणीय घट झाली आहे. सध्याच्या घडीला देशात 1 लाख 35 हजार 918 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही तब्बल 17 महिन्यानंतरची निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या असून, देशवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

भारतात गेल्या 24 तासांत देशभरात 11 हजार 271 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 11 हजार 376 बरे कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने ‘एएनआय’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 44 लाख 37 हजार 307 एवढी झाली आहे. त्यापैकी 3 कोटी 38 लाख 37 हजार 859 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 285 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनामुळे देशात आजवर 4 लाख 63 हजार 530 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.32 टक्के एवढा झाला आहे. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.25 टक्के एवढा झाला आहे.

आयसीएमआर’च्या आकडेवारीनुसार देशात आजवर 62.37 कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 12.55 लाख नमूने तपासण्यात आले आहेत.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत देशात आत्तापर्यंत 112.010 कोटी नागरिकांना लस टोचण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 57.43 लाख जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.