Vaki Budruk : वृक्षारोपण करून इंजिनिअर सुनील टोपे यांनी साजरा केला वाढदिवस

एमपीसी न्यूज – विविध सामाजिक कार्यात सहभागी असणारे लोकप्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते इंजिनिअर सुनील टोपे यांनी वाकी बुद्रुक(ता.खेड) येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या आवारात चिकू,नारळ,चाफा,अशोक आदी झाडे लावण्यात आली.

खेड्यांतील गावांचा विकास झपाट्याने होत असून गावांमध्ये वास्तव्यास येणारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे झाडे आणि निसर्गाची हानी होत आहे. बेसुमार सिमेंटची जंगले उभी राहत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे काळाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर सुनील टोपे यांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला.

  • यावेळी वाकी बुद्रुक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पप्पू चव्हाण, गारगोटे शिवार अध्यक्ष संतोष गारगोटे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गोविंद कड, दत्ता गारगोटे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम टोपे, इंजिनिअर प्रतिक माकर आदी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्वांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, सांगाडे सर, सांडभोर यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.