Pune MNS News : पुण्यात मनसेला खिंडार, वसंत मोरे यांच्या कट्टर समर्थकाचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’

एमपीसी न्यूज – पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (Pune MNS) मागील काही दिवसांपासून सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. वसंत मोरे यांनी तर पुणे शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर असलेली आपली नाराजी उघडउघड बोलून दाखवली आहे. त्यानंतर आता पुढे मनसेला पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. पुण्यातील वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक असलेले निलेश माझीरे यांनी आता मनसे पक्षाला रामराम केला आहे.

निलेश माझीरे हे मनसेच्या माथाडी सेनेचे अध्यक्ष होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यामुळे मागील काही दिवसांपासून निलेश माझीरे नाराज होते, तर वसंत मोरे यांनी देखील यावरून आपली खंत व्यक्त केली होती. त्यानंतर आता निलेश माझीरे यांनी पक्षाला अखेरचा रामराम केला आहे. मात्र पक्ष सोडताना त्यांनी पुण्यातील मनसेच्या (Pune MNS) दोन पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

Ikhlas Sayyad: राष्ट्रवादी पिंपरी विधानसभेच्या कार्याध्यक्षपदी इखलास सय्यद यांची नियुक्ती

मनसेचे (Pune MNS) सध्याची पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि मनसेचे नेते बाबू वागस्कर यांच्यामुळेच पक्ष सोडत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मी वसंत मोरे यांचा कट्टर समर्थक असल्याने पुणे मनसेची कोर कमिटी मला सातत्याने डावलत आहे असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला आहे. निलेश माझीरे आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.