Wai : वाईत धोम धरणाचा कालवा फुटला

एमपीसी न्यूज – सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आज (16, डिसेंबर) सकाळी मोठी (Wai )घटना घडली आहे. वाई तालुक्यातील ओझर्डी गावात धोम धरणाचा कालवा फुटला आहे.

कालवा फुटल्यामुळे संपूर्ण गावामध्ये पाणी शिरल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. जवळपास 150 ऊसतोड मजुरांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांचे संसारोपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Maval : शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे रक्तदान शिबिर

वाई तालुक्यातील  धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या (Wai)हद्दीत शनिवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. त्यामुळे ओढ्याला पुराचे स्वरूप आले.

यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेला आहे. रातोरात जवळपास 150 ऊसतोड मजूरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

 

यामध्ये मजूरांचे संसारउपयोगी साहित्य मात्र वाहून गेले आहे. तसेच 12 बैलांना वाचवण्यात यश आले असून 2 बैल पुरामध्ये वाहून गेलेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे चार वाजता वाजल्यापासून ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.