Wakad : भर रस्त्यात महिलेशी गैरवर्तणूक करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज- रस्त्यामध्ये थांबलेल्या महिलेशी गैरवर्तणूक करत तिचा विनयभंग (Wakad) करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी(दि.17) सायंकाळी ताथवडे येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी सुरेश उर्फ शिवाप्पा आप्पांना हाडागळे (वय 39 रा .ताथवडे ) याला अटक केली आहे.

Bhosari : गांजा विक्री प्रकरणी महिलेस अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या थांबल्या असताना त्यांच्या तोंड ओळखीचा सुरेश हा त्यांच्याजवळ आला व त्याने फिर्यादी यांच्याशी मिठी मारून गैरवर्तणूक केली. यावरून वाकड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.