Wakad : गोडाऊनमधून पॉईंट सेल्स सिस्टीम मशीन चोरीस

एमपीसी न्यूज – दरवाजाचे कुलूप तोडून दुकानाच्या गोडाऊनमधून चोरट्यांनी एक पॉइन्ट सेल्स सिस्टीम मशीन चोरून नेले. ही घटना वाकड येथे 18 जानेवारी रोजी घडली.

रमेश कल्याण फुलारी (वय 25, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्त मंदिर रोड, वाकड येथे फिर्यादी फुलारी यांचे सी सी डी शॉप आहे. 17 जानेवारी रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून गोडाऊनमधून 45 हजार रुपये किंमतीची एक पॉइन्ट सेल्स सिस्टीम मशीन चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.