Wakad Crime News : युट्यूबवर चोरीचे व्हीडिओ बघून चेन स्नॅचिंग करणारा चोरटा जेरबंद; सात गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज – युट्यूबवर चेन चोरीचे व्हिडिओ बघून चेन स्नॅचिंग करणारा सराईत चोरट्यास वाकड पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून सात चोरीचे गुन्हे उघडकीस आणत सहा लाख 13 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा चोरटा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.

सौरभ अरुण यादव (वय 20, रा. आझाद चौक, निगडी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी दुचाकीचा वापर करून रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन पसार व्हायचा. वाकड पोलिसांनी त्याला काळेवाडी येथील धनगरबाबा मंदिराजवळून ताब्यात घेतले.

आरोपीने सात चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्याच्या जवळून 120 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व एक मोपेड, असा एकूण सहा लाख 13 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.