Wakad Crime News : वाहन चोरी करणा-या अल्पवयीन मुलाकडून तीन दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – साथीदारासोबत मिळून वाहन चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला वाकड पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. दरम्यान त्याचा एक साथीदार पळून गेला. ताब्यात घेतलेल्या मुलाकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

घरासमोर लॉक करून पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत वसीम सलीम मुल्ला (वय 31, रा. पवारनगर, थेरगाव) यांनी 28 नोव्हेंबर रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याचा तपास वाकड पोलीस करीत होते. वाकड परिसरात गस्त घालत असताना प्रशांत गिलबिले, सुरज सुतार यांना एका दुचाकीवरुन दोघेजण संशयितरित्या जाताना दिसले.

पोलिसांनी दुचाकींचा पाठलाग केला. पोलिसांची चाहूल लागताच दुचाकीवरील एकजण पळून गेला. पोलिसांनी दुस-या मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असून त्याने त्याच्या साथीदारासोबत मिळून वाकड परिसरात दोन आणि चतुःशृंगी परिसरात एक दुचाकी चोरल्याचे सांगितले.

बाळू बबन चव्हाण (वय 23, रा. वाकड) हा पळून गेला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाकडून 45 हजारांच्या तीन दुचाकी जप्त केल्या.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी प्रशांत गिलबिले, सुरज सुतार, बिभीषण कन्हेरकर, बापूसाहेब धुमाळ, बाबाजान इनामदार, विक्रम जगदाळे, जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, विक्रम कुदळ, सचिन नरुटे, प्रमोद कदम, शाम बाबा, तात्या शिंदे, नितीन गेंगजे, दिनकर पोंदकुले यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.