Wakad: मोटारीचे रजिस्ट्रेशन करून न देता व्यावसायिकाची फसवणूक

एमपीसी न्यूज – नवीन मोटारीसाठी रजिस्ट्रेशन फी घेतल्यानंतर शोरूम मालकाने मोटारीचे आरटीओमध्ये रजिस्ट्रेशन न करता एका व्यावसायिकाची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथील मे. साईसाक्षी अभिकिरण मोटर्स येथे घडला.

मे. साईसाक्षी अभिकिरण मोटर्सचे मालक राकेश राजपाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाची ईश्वर शिवदास पटेल (वय 45, रा. लोणावळा) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पटेल यांनी आरोपीच्या वाकड येथील मे. साईसाक्षी अभिकिरण मोटर्समधून फोर्ड कंपनीची इंडेव्हर 3.2 ली टिटॉनियम ही महागडी मोटार खरेदी केली. फिर्यादी मोटारीच्या खरेदीसाठी आरटीओ टॅक्स, इन्शुरन्स, वॉरंटी, मोटारीची मूळ किंमत असे 36 लाख 26 हजार रूपये धनादेशाव्दारे दिले. आरोपीने मोटारीचे रजिस्ट्रेशन, टॅक्स व आदी चार्जेससाठी 4 लाख 10 हजार 133 रूपये घेऊनही रजिस्ट्रेशन न करता पटेल यांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.