BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : गांजा विक्री करणा-या एकाला अटक; दोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – विक्री करण्यासाठी बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 2 किलो 110 ग्रॅम वजनाचा 52 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 15) दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी येथे केली.

रामधारी शामदेव यादव (वय 46, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार राजन गोविंद महाडिक यांनी फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहाटणी येथे पाचपीर चौकाकडे जाणा-या रोडवर एक इसम गांजा घेऊन आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रामधारी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 52 हजार 500 रुपये किमतीचा 2 किलो 110 ग्रॅम वाजताना गांजा मिळून आला. यावरून त्याला अटक करून त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.