Wakad : डिलिव्हरी बॉयकडून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – महिला लिफ्टमध्ये एकटी असल्याचा फायदा घेत हॉटेलच्या डिलेव्हरी बॉयने तिचा विनयभंग केला. ही घटना शनिवारी (दि. 12) सकाळी पावणेसातच्या सुमारास वाकड परिसरात घडली.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार धनराज काटेकर (रा. सांगवी) या डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सकाळी नेहमीप्रमाणे वाकड येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर धुणीभांडी करण्यासाठी लिफ्टने जात होती. यावेळी पहिल्या मजल्यावर आरोपी काटेकर लिफ्टमध्ये घुसला. लिफ्टमध्ये महिला एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर येताच महिलेनने तेथून पळ काढला. तिने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर त्यांनी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी आरोपी काटेकर हा हिंजवडी येथील मसीझन्सफ हॉटेलचा डिलेव्हरी बॉय असल्याची माहिती मिळाली. याप्रकरणाचा पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.