Wakad News : एम्एनजीएलची पाइपलाइन फुटून गॅस गळती; सकाळपासून नागरिकांचा रखडला स्वयंपाक

एमपीसी न्यूज – आज सकाळी वाकड (Wakad News) येथे रस्त्याचे काम चालू असताना एमएनजीएलची पाइपलाइन फुटली व गॅस गळती झाल्याची घटना घडली. त्वरित एमएनजीएलशी संपर्क साधून गॅसचा पुरवठा बंद करण्यात आला. म्हणून मोठी हानी टळली. तसेच त्वरित गॅस लाइन बंद केल्याने फायर ब्रिगेडची गरज भासली नाही.

ही पाइपलाइन फुटल्याने गॅसची गळती झाली असून वाकड परिसरातील साधारण 300 सोसायटी व 3000 फ्लॅट यांना सकाळपासून गॅसचा पुरवठा गेलेला नाही. उत्कर्ष नगरमधील दत्त मंदिर रोड, काला खडक, वेणू नगर, कावेरी नगर आदी ठिकाणांच्या घरांमध्ये गॅस पुरवठा झालेला नाही.

गॅस घरी नसला की गृहिणींना स्वयंपाक बनवायला किंवा आंघोळीचे पाणी तापवायला अडचण होते. लोकांना स्वतःच्या दैनंदिन कार्यामध्ये (Wakad News) अडथळा निर्माण होत असल्याने रस्त्यांची कामे करताना कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना नागरिकांनी केल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.