Wakad : आधार लिंक करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज – आधार लिंक करण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेला फोन करून बँक खात्याची गोपनीय माहिती विचारून त्याद्वारे खात्यातून 39 हजार 940 रुपये काढले. ही घटना कस्पटेवस्ती वाकड येथे घडली.

अरुंधती तारानाथ जेरे (वय 74, रा. निसर्ग सृष्टी अपार्टमेंट, कस्पटेवस्ती, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात इसमाने फिर्यादी अरुंधती यांना 31 ऑक्टोबर रोजी फोन केला. तो हुबळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या केशवापूर शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. अरुंधती यांचे आधारकार्ड बँक खात्याला लिंक करायचे असल्याचे सांगत त्यासाठी एटीएम कार्डची माहिती घेतली. त्याद्वारे आरोपीने अरुंधती यांच्या खात्यामधून ऑनलाईन माध्यमातून 39 हजार 940 रुपये काढून घेतले. यावरून अरुंधती यांनी वाकड पोलिसात गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.