Wakad : पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज- फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी तक्रारदार व्यक्तीकडून 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली.

मिलन शंतनू कुरकुटे (वय 32, पोलीस उपनिरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती. या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिकाऱ्यांना आरोपी करण्यासाठी आरोपी मिलन कुरकुटे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी कुरकुटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.