Wakad Crime News : लग्नाचे आमिष दाखवत  विवाहितेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून ठिकठिकाणी नेऊन वारंवार तिच्यावर बलात्कार केल्याची घटना वाकड परिसरात उघडकीस आली आहे. याबाबत एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सन 2018 ते  मार्च 2021 या कालावधीत वनदेवनगर आनंद हॉस्पिटल जवळ थेरगाव, पंचशील कॉलनी गणेश नगर थेरगाव, विठ्ठल लॉन्स लक्ष्मी चौक हिंजवडी, साई लॉज जगताप डेअरी चौक वाकड आणि बाणेर येथे घडला आहे.

जिशान निजामुद्दीन शेख (वय 26, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा विवाह झाला आहे. तरीही आरोपीने तिला  लग्नाचे आमिष दाखवले. लग्नाच्या आमिषाने विवाहितेला वेगवेगळ्या ठिकाणी   नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.   विवाहितेने आरोपीला लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली.

तसेच आरोपीने फिर्यादी विवाहितेसोबत काढलेले फोटो इंस्टाग्राम व व्हाट्सअपवर पोस्ट केले. शिवाय  वेगवेगळ्या कारणांसाठी आरोपीने विवाहितेकडून 60 हजार रुपये घेतले असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.