Wakad : शेतजमीन नावावर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला पत्नी आणि मुलांकडून मारहाण

एमपीसी न्यूज : एका ज्येष्ठ नागरिकाला (Wakad) त्यांचे पैसे व शेतजमीन नावावर करण्यासाठी पत्नीने व मुलाने शिवीगाळ व मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना वाकड येथे काल 21 डिसेंबर 2022 रोजी घडली आहे.
याबाबत मधुकर इंगोले (वय 60 वर्षे, रा. सोनिक्स टॉवर, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन इंगोले (वय 35 वर्षे व महिला आरोपी वय 55 वर्षे) या दोन्ही आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगा सचिन हे घरी (Wakad) असताना पैसे व गावाकडील शेतजमीन हे आमच्या नावावर करा, नाहीतर आम्ही तुम्हाला संपवतो, अशी धमकी फिर्यादी यांना दिली. तसेच फिर्यादीचा मुलगा सचिन व पत्नी यांनी शिवीगाळ करत हाताने मारहाण करून मुलगा सचिन याने पडद्याला वापरण्यात येणाऱ्या स्टीलच्या पाईपने व चाकूने मारहाण करून डोक्याला व शरीरावर गंभीर स्वरूपाची दुखापत केली आहे. तसेच फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादी यांच्या सोबत गैरवर्तणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.