Chakan : टँकरच्या धडकेत महिला जखमी; आरोपीला अटक

एमपीसी न्यूज : चाकण येथे टँकरने धडक (Chakan) दिल्याने पादचारी महिला जखमी झाली असून टँकर चालकाला अटक करण्यात आले आहे. याबाबत 58 वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सचिन आडे (वय 22 वर्ष, रा. पानसरे मळा, चाकण) या आरोपीला अटक करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात भा.द.वि कलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 प्रमाणे चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल बुधवार 21 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास माणिक चौक, चाकण येथे हा अपघात घडला आहे. फिर्यादी या नेरूळला जाण्यासाठी रांजणगाव निघाल्या. त्या बसने चाकण माणिक चौक येथे दुपारी उतरल्या. त्या चाकण बसस्थानाकाकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना शिक्रापूर रोडकडून तळेगाव चौकाकडे जाणाऱ्या पाण्याचा टँकर फिर्यादीसमोर अचानक आला व त्याचा त्यांना धक्का लागल्याने खाली रोडवर पडल्या.

Wakad : शेतजमीन नावावर करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला पत्नी आणि मुलांकडून मारहाण

त्यावेळी फिर्यादीच्या डाव्या खांद्याला व कमरेला मार (Chakan) लागून दुखापत झाली आहे. त्यानंतर तिथे जमलेल्या लोकांच्या मदतीने फिर्यादीला आस्था हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.