Wakad : वाकड, देहूरोड परिसरातून दोन दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविल्या

Wakad: Two bikes were abducted by unknown thieves from Wakad, Dehu Road area

एमपीसी न्यूज – वाकड आणि देहूरोड परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रकाश सोनू जाधव (वय 54, रा. कार्ला, ता. मावळ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 7) फिर्याद दिली आहे. जाधव यांनी त्यांची 10 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / वाय 1693) 9 मार्च रोजी रात्री सात वाजता थेरगाव येथील झरे पाटील कॉम्प्लेक्सच्या मागे पार्क करून ठेवली होती. 10 मार्च रोजी सकाळी त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे उघडकीस आले. मात्र, याबाबत जवळपास दोन महिन्यांनी त्यांनी फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

मल्लेश नागेंद्र बिरनाळी (वय 31, रा. दत्तनगर, किवळे, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिरनाळी यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची केटीएम ड्यूक (एम एच 14 / एफ के 5354) ही दुचाकी बुधवारी (दि. 6) रात्री त्यांच्या घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकीचे लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. गुरुवारी (दि. 7) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.