Wakad : ऑनलाईन विवाहाच्या साईटवरील मैत्री पडली महागात

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – विवाह जुळवणा-या ऑनलाईन साईटवरून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्याच प्रेमाने शेवटी विश्वासघात केला. प्रियकराने लग्नाचे अमिश दाखवून बलात्कार केला. लग्नासाठी त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने थेट नकार दिला. ऑनलाईन विवाहाच्या साईटवरील मैत्री तरुणीला चांगलीच महागात पडली आहे.

पीडित 27 वर्षीय तरुणीने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल प्रकाश दास (वय 30, रा. थेरगाव. मूळ रा. परांडा, उस्मानाबाद) याला वाकड पोलिसांनी अटक केली केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नवरी मिळे नव-याला’ ही ऑनलाईन वधू-वर सूचक साईट आहे. या साईटवर पीडित तरुणी आणि राहुल या दोघांनी नाव नोंदणी केली. मे 2018 मध्ये त्यांची त्यातूनच ओळख झाली. ओळख झाल्यानंतर वेबसाईटची गरज संपली आणि दोघांच्या व्यक्तिगत भेटीगाठी वाढल्या. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनी लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला.

राहुलने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. आपले लग्न होणार असल्याने तरुणी राहुल सोबत मोकळेपणाने वागू लागली. याचाच राहुलने फायदा घेतला आणि तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवला. दरम्यान, त्याने दोघांचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने थेट नकार दिला. तिने त्याच्याकडे विनंतीआर्जव केले पण राहुलने तिचे अश्लील फोटो त्याच्याकडे असून ते नातेवाईकांना दाखवून तसेच सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी दिली. तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. वाकड पोलिसांनी त्याला अटक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.