Pimpri: अधिकारी, कर्मचा-यांनो ठेकेदारांकडून ‘गिफ्ट’ स्वीकारु नका; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा इशारा...

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांकडून कोणतीही भेटवस्तू (‘गिफ्ट’), देणग्या स्वीकारु नयेत. ठेकेदार, कोणतीही व्यक्ती, संस्थाकडून कुटुंबियाला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. गिफ्ट स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाईची कारवाई केली जाणार आहे. याबाबतचा परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढले आहे.

प्रभावी आणि लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अधिका-याचे कर्तव्य आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक)नियम 1979 मधील कलम 12 नुसार कोणत्याही शासकीय कर्मचा-याने कोणतीही भेटवस्तू स्वत: स्वीकारता कामा नये. तसेच कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला, त्यांच्या वतीने काम करणा-या व्यक्तीला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देता कामा नये. तसेच कर्मचा-याने त्यांच्याशी कार्यालयीन व्यवहार असणा-या कोणत्याही व्यक्तीकडून किंवा औद्योगिक, वाणिज्यिक संस्थांकडून, संघटनांकडून किंवा तत्सम मंडळाकडून केलेला पाहूणचार स्वीकारण्याचे टाळावे असे स्पष्ट निर्देश आहेत.

महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ठेकेदारांकडून कोणतीही भेटवस्तू (‘गिफ्ट’), देणग्या स्वीकारु नयेत. ठेकेदार, कोणतीही व्यक्ती, संस्थाकडून कुटुंबियाला भेटवस्तू स्वीकारण्यास परवानगी देऊ नये. सुरक्षा रक्षकांनी अशा भेटवस्तू घेऊन येणा-यास कार्यालयात जाण्यास मज्जाव करावा. अधिकारी, कर्मचा-याने भेटवस्तू स्वीकारल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाईची कारवाई केली जाईल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.