Weather Report : कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता

Weather Report: Chance of heavy rain in some places and heavy rain in sparse places in Konkan-Goa येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा सुटण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भात विजांचा कडकडाट व मेघ गर्जना होऊ शकते असे हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

आज राज्याच्या सर्व भागातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. तर, पुण्यात आज 29.9  अं.से. कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात येत्या दोन दिवसात आकाश ढगाळ राहून जोरदार व मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान खात्याने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.